Ideas

शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आम. डॉ देवराव होळी यांचे प्रतिपादन स्पर्धेतून दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावे

इंदिरानगर येथील रात्रकालीन टेनिस  बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

    गडचिरोली :- दि 24/ क्रिकेट हा खेळ सर्वत्र लोकप्रिय असून शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या आवडीने खेळला जातो अशा चांगल्या  रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शहरातील इंदिरानगर येथे होत आहे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. एका चांगल्या स्पर्धेचे आयोजन आयोजक प्रमोदजी पिपरे व अनुराग पिपरे यांनी केले असून क्रिकेट चमू व खेळाडूना एक चांगली संधी या माध्यमातून उपलब्ध करून दिली हा त्यांचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचेही यावेळी आम. डॉ देवराव होळी  म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात व शहराच्या विकासासाठी त्यांचे निरंतर प्रयत्न सुरू असून गेल्या 5 वर्षात नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपयाचा निधी मंजूर करून आणला व इंदिरानगर सह गडचिरोली शहराचा विकास करण्यावर भर दिला यापुढेही आपण त्यांना संधी दिल्यास ते विकासात्मक कामे करतांना मागे पाहणार नाहीत, अशी ग्वाही यावेळी देवरावजी होळी यांनी दिली. व  या स्पर्धेत सहभागी संघांनी शांत संयमाने व खिलाडी वृत्तीने खेळ करून स्पर्धेत जिंकण्याचा प्रयत्न करावा व स्पर्धेच्या माध्यमातून चांगले दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावे असे प्रतिपादन आम. डॉ देवराव होळी यांनी केले.

   अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन काल दिनांक 23 डिसेंबर रोजी गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे , किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम माजी नगराध्यक्ष तथा भाजपा ओबीसी महिला मोर्चा च्या जिल्हा संयोजिका योगिता पिपरे, भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये जिल्हा महामंत्री अनिल तिडके जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर  पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे उपस्थित होते.

      विशेष अतिथी म्हणून या क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजक मार्कंडेय हास्पिटल चे संचालक डॉक्टर प्रशांत चलाख, धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अनंत कुंभारे, सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर यशवंत दुर्गे , अनंत हास्पिटलचे संचालक डॉ अनंत कारेकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गजाननराव नैताम, भुपेश डोंगरे, रवी फोटो स्टुडिओ चे संचालक रवीभाऊ मेश्राम, भूमी एमपायरचे संचालक, श्री काँक्रीट प्रॉडक्टचे संचालक नकुल कुकडपवार, कंत्राटदार प्रणय खुणे, हॉटेल लॅन्डमार्क चे संचालक रहीम डोडिआ, आर्यन मोटर्स चे संचालक गुप्ता श्री साई समर्थ ट्रेडर्सचे संचालक उमाजी वासाडे, क्रिकेट स्पर्धेसाठी जागा उपलब्ध करून देणारे जागेचे मालक वाल्मिक दुधबळे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, भाजपचे शहर महामंत्री केशव निंबोड, दलित आघाडीचे शहर अध्यक्ष अरुण उराडे, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, निता उंदिरवाडे, रश्मी बाणमारे, पूनम हेमके, ज्योती बागडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते


        यावेळी आम डॉ देवराव होळी, बाबुराव कोहळे, तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पिपरे यांनी तर संचालन गजेंद्र डोमळे यांनी केले. आभार दैनिक भास्कर चे जिल्हा प्रतिनिधी रुपराज वाकोडे यांनी मानले. क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक अनुराग पिपरे, नितेश खडसे,ऋषीकेश पिपरे, रुपराज वाकोडे, गजेंद्र डोमळे, प्रफुल चापले, विक्की कागदेलवार, किशोर खेवले, जगदीश गडपायले, अरुण शेडमाके, अक्की मडावी,  भरत पाकमोडे, संजय बोधलकर, नरेंद्र भांडेकर, अशोक फुकटे, श्रीनिवास भुरसे राकेश नैताम , टेमसुजी नैताम तसेच अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब,गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगर चे पदाधिकारी व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

     या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 31000 रुपये , द्वितीय 21000 रुपये तर तृतीय पारितोषिक 11,000 रुपये ठेवण्यात आले असून विजेत्या संघाला आकर्षक चषक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments