Ideas

वाघाच्या हल्ल्यात महिला ठारगडचिरोली, ता. २३ : जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत दिभना गावांनजीकच्या जंगलात घडली. ताराबाई लोनबले (७०) रा. जेप्रा असे मृत महिलेचे नाव आहे.

ताराबाई लोनबले ही जंगलात सरपण गोळा करीत असताना झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला. यात ती गतप्राण झाली. वाघाने तिला काही अंतरावर फरफटत नेले. माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. परिसरात टी-६ वाघिणीचा वावर असून, तिने दहा दिवसांपूर्वी चार बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे तिनेच वृद्धेवर हल्ला केला असावा, असा अंदाज आहे. या वाघिणीसंदर्भात वनविभागाने आधीच सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments