Ideas

५०० मुलींनी घेतले मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे

 


लॉयड्स मेटल्सकडून सहा महिने पुरतील एवढ्या सैनिटरी नॅपकिन्सचे वितरण

    एटापल्ली लॉयड मेटल्स आणि एनर्जी विवरण एलायनमेंट फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १८ दरम्यान तालुक्याच्या तोडसा येथील शासकीय माध्यमिक तथा उच माध्यमिक कन्या आश्रमशाळेत आयोजित कार्यशाळेत एकूण ५०० किशोरवयीन मुलीना मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशन व प्रशिक्षण देण्यात आले. उपस्थित मुलींनी येथे मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे घेतले.

  प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन माजी सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव, तथा सर्वोच्च न्यायालय समिती सदस्य उज्ज्वल उके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता होते.

    यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्रिशरण फाउंडेशन पुणेच्या व्यवथापकीय संचालक प्रज्ञा वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोपाल रॉय, हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाबूराव दडस, त्रिशरण फाउंडेशनचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत वाघमारे,पूणे विभागीय व्यवस्थापक शीतल कांबळे,गडचिरोली जिल्हा समन्वयक सचिन कालेश्वर,विकासदूत रचना कांबळे,अर्चना बनकर,विरांगना नैताम,पायल कुंभारे,विनोबा भावे आदिवासी आश्रम शाळा हेडरीचे मुख्यध्यापक इमले,वसतिगृहाचे अधीक्षक गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.    कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतीगृह एटापल्ली येथील अधीक्षिकेने सर्वोतपरी मदत करून हे प्रशिक्षण यशस्वी करण्यात मदत केली.विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आलेल्या फार्ममध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण त्यांनी पहिल्यांदाच घेतले असून या प्रशिक्षणामुळे त्यांना आवश्यक ती माहिती मिळून त्यांचे अनेक गैरसमज दुर झाले असल्साबाबत नमूद केले आहे. तसेच असे प्रशिक्षण गावात देखील घेऊन इतर मुली व महिलांना त्याचा लाभ व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

  


Post a Comment

0 Comments