Ideas

नववर्षानिमित्त 44 जणांचा दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार

 


      गडचिरोली : गाव संघटनेच्या मागणीनुसार दुर्गम अशा जप्पी व कोंदावाही येथे मुक्तीपथतर्फे व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही शिबिरातून एकूण 44 रुग्णांनी उपचार घेत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला आहे.

धानोरा तालुक्यातील जप्पी या गावात संघटनेच्या मागणीनुसार  शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी एकूण 23 रुग्णांनी परिपूर्ण उपचार घेतला. रुग्णांचे समुपदेशन प्राजक्ता मेश्राम तर केस हिस्ट्री छत्रपती घवघवे यांनी घेतली. शिबिराचे नियोजन तालुका टीमने केले. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील सहकारी तुळशीराम इचामी, प्रभू ईचामी, रमेश ईचामी यांनी सहकार्य केले.
एटापल्ली तालुक्यातील कोंदावाही येथे गाव पातळी व्यसन उपचार क्लिनिकमध्ये 21 पेशंटने उपचार घेतला. पेशंटची केस हिस्ट्री संयोजिका पूजा येलूरकर यांनी घेतली आहे.तर समुपदेशन साईनाथ मोहूर्ले यांनी केले .नियोजन व व्यवस्थापन मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार , तालुका प्रेरक  रवींद्र वैरागडे, स्पार्क कार्यकर्ती रूनाली कुमोटी यांनी केले. गाव क्लिनिक यशस्वितेसाठी मुक्तीपथ गाव संघटन सदस्य  गाव पाटील विजय हीचामी , ग्रामपंचायत सदस्य रावजी मटामी, अंगणवाडी सेविका लक्ष्मी विश्वास , आशा वर्कर वैशाली सातपुते, मुख्याध्यापक एन. एल. चीमुरकर  यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments