गडचिरोली:- आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली कॅम्प एरीया येथील कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .त्यावेळी कार्यक्रमाला जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष संजीव जिवतोडे,शहर सह संयोजक रुपेश सावसाकडे, , महिला जिल्हा संयोजक मिनाक्षी ताई खरवडे, महिला युवा सह संयोजक सोनल नन्नावरे हितेंद्र गेडाम आदी हजर होते.
0 Comments