Ideas

नवभारत पॉवरफुल वुमेन पुरस्काराने माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे सन्मानित Right time news



गडचिरोली २८: नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणाऱ्या नवभारत पावरफुल वूमन 2022 पुरस्काराने गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांना सन्मानित करण्यात आले काल दिनांक 27 नोव्हेंबर रोजी नागपूर येथील तुली इम्पेरियल हॉटेलमध्ये आयोजित नवभारत पावरफुल वूमन 2022 पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रसिद्ध सिने अभिनेत्री किशोरी शहाणे, खासदार नवनीत राणा, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदारी आयपीएस अधिकारी अस्वती दोरजे, अँम्स च्या डायरेक्टर डॉक्टर विभा दत्ता इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्सच्या डायरेक्टर डॉक्टर अंजली रहातगावकर, सुप्रीम कोर्टाच्या एडवोकेट नुपूर धमीजा, आरोग्य विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर विनिता जैन अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण इत्यादी विविध विभागातील व क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते मोमेंटो प्रशस्तीपत्र व पुरस्कार देऊन माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे  यांना सन्मानित करण्यात आले.
        माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी आपल्या पाच वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत शहरातील ज्वलंत व प्रलंबित समस्या, अडचणी प्राधान्याने दूर करण्याचा प्रयत्न केला गडचिरोली शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करून अथक परिश्रम  घेतले रस्ते , नाल्याच नाही तर शहरातील ओपन पेस भागांचा विकास, विद्युत, शुद्ध पाण्याची व्यवस्था, नागरिकांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. गरीब व गरजू नागरिकांना त्यांच्या  हक्कांचे घर मिळावे म्हणून शेकडो नागरिकांचे घरकुल मंजूर करून दिले व शहरात सर्व्हेक्षण करून शौचालय नसलेल्या गरीब, कामगारांसाठी शौचालयमंजूर करून दिले. ऐकूनच गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून चांगली विकास कामे केली व शहराला स्वच्छ व सुंदर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन नवभारत वृत्तपत्र समूहाच्या वतीने यावर्षीचा नवभारत पावरफुल वुमन 2022 पुरस्काराने त्यांच्या गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी मोजक्या कर्तव्यनिष्ठ व जबाबदारीने काम करणाऱ्या चार कर्तबगार महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण समारंभाला नवभारत वृत्तपत्र समूहाचे संपादक मालक वरिष्ठ पत्रकार  तसेच नवभारत, नवराष्ट्र ग्रुप मध्ये काम करणारे सर्व वरिष्ठ पत्रकार, अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments