Ideas

गडचिरोलीच्या विकासाला नवा वेग देणारी भेटभाजयुमो जिल्हा महामंत्री आकाश सातपुते यांची केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : भाजयुमो गडचिरोली जिल्हा महामंत्री आकाश सातपुते यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी स्नेहपूर्ण सौजन्य भेट घेतली. या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर, स्थानिक समस्यांवर तसेच युवकांसाठी केंद्र व राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर फलदायी चर्चा झाली.

गडचिरोलीमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रगती, केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी, तसेच दुर्गम भागांपर्यंत सुविधा पोहोचवताना येणाऱ्या अडचणी याविषयी सातपुते यांनी सविस्तर माहिती दिली. रिजिजू यांनीही आगामी प्रकल्पांना गती देण्यासाठी मार्गदर्शक सूचना देत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.

भेटीचे वातावरण अत्यंत सकारात्मक, सौहार्दपूर्ण व समाधानकारक राहिले. “गडचिरोलीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा संवादात्मक भेटी मार्गदर्शक ठरतात,” असे सातपुते यांनी नमूद केले.

या चर्चेमुळे जिल्ह्यातील विकास प्रक्रियेला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments