Ideas

गडचिरोलीत सत्य साईबाबा पालखी सोहळ्याचे मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी घेतले दर्शन


दि. २३ नोव्हेंबर २०२५ | गडचिरोली

गडचिरोली शहरात श्रद्धा, समर्पण आणि भक्तिभावाचा अनोखा संगम घडवत सत्य साईबाबांच्या पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन झाले. शेकडो सत्य साई भक्तांच्या सहकार्याने निघालेल्या या पालखीने शहरातील वातावरण आध्यात्मिकतेने भारावून टाकले.

रामनगरातील शाहू नगर परिसरात पालखी पोहोचताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या निवासस्थानासमोर पालखीला सामूहिक वंदन करण्यात आले.
डॉ. नेते यांनी भक्तिभावाने पालखीची पूजा-अर्चा करून सत्य साईबाबांचे दर्शन घेतले.

यावेळी OBC मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, साईभक्त किशोर चिल्लमवार यांच्यासह असंख्य श्रद्धावान भक्त मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
सत्संग, भजन आणि भक्तीमय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या पालखी सोहळ्याने गडचिरोलीच्या सामाजिक- धार्मिक एकतेला आणि भक्तीपरंपरेला एक नवी उंची मिळाली.

Post a Comment

0 Comments