सर्व भाजपा कार्यकर्ते तसेच समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर)
गडचिरोली : गडचिरोली शहरात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, महसूल मंत्री, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात प्रणोती सागर निंबोरकर, नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार, कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकांसाठीचे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रम आज दुपारी 12 वाजता, चामोर्शी बसस्टॉप समोर, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
पक्ष संघटन, आगामी निवडणुकीची तयारी तसेच स्थानिक विविध विकास विषयांवर या मेळाव्यात चर्चा होणार असून या कार्यक्रमाबद्दल कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.


0 Comments