धानोरा : भुसुमकुडो :-
ग्रामीण व आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली व्दारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दिवंगत संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष शिक्षण महर्षी प्राचार्य स्व. रमेशचंद्रजी मुनघाटे यांच्या ७६ व्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम व मौजा-"भुसुमकुडो" येथे ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत पार पडला.थंडीचा जोर वाढू लागल्याने सामाजिक संवेदनशीलता दाखवत महाविद्यालयाने हा उपक्रम राबविला. कार्यक्रमात गावातील गरजू, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारांना मोफत ब्लॅंकेटचे व लहान मुलांना स्वेटर वितरण करण्यात आले.
“प्राचार्य स्व. रमेशचंद्रजी मुनघाटे यांनी आयुष्यभर शिक्षण, ग्रामीण विकास आणि आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी काम केले. त्यांची जयंती केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता प्रत्यक्ष लोकांच्या मदतीतून साजरी करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे मुनघाटे सरांचे आदर्श दृष्टीपुढे ठेवून पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांची संख्या वाढविणार असल्याचे” मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय थुल यांनी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमास उपस्थित लाभार्थ्यांनी संस्थेचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे गावात सामाजिक एकतेची भावना अधिक मजबूत होते, अशी भावना व्यक्त केली. ब्लॅंकेट मिळाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. एका वृद्ध लाभार्थ्याने सांगितले,आम्ही दरवर्षी थंडीचा त्रास सहन करतो. आज महाविद्यालयामुळे उबदार ब्लॅंकेट मिळाले ही आमच्या दृष्टीने फार मोठी उपलब्धी आहे.गावातील तरुण मंडळींनीही कार्यक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,स्थानीक ग्रामस्थ,कार्यकर्ते, गावातील मान्यवर,महिला, बचतगटाचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ आर पी किरमीरे डाॅ विणा जम्बेवार डॉ एच डी लांजेवार डॉ दामोधर झाडे डॉ संजय मुरकुटे डॉ नितेश पुण्यप्रेड्डीवार प्रा मांतेश तोंडरे डॉ सचिन धवनकर प्रा ज्ञानेश बनसोड डॉ प्रियंका पठाडे डॉ प्रवीण गोहणे प्रा धाकळे प्रा खोबरागडे प्रा वटक प्रा आवारी प्रा रणदिवे प्रा करमनकर प्रा भुरसे प्रा मिनाक्षी खोबरागडे प्रा खोमेश्वरी लाड श्री मानापुरे श्री गोहणे श्री लांबट श्री कायते श्रीमती चंदेल श्री नन्नावरे श्री वाढणकर श्री राजगडे यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डॉ गणेश चुदरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा प्रशांत वाळके यांनी व्यक्त केले.


0 Comments