Ideas

रुग्णाला रक्त मिळवून देण्यासाठी समाजसेविकेचे तत्पर कार्य

घोट :महिला रुग्णालयातून एका रुग्णास रक्ताची अत्यावश्यक गरज असल्याची माहिती समाज सेविका शीतल सोमनानी यांना प्राप्त झाली. तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी संबंधित रुग्णाशी संपर्क साधला.

या प्रकरणात समाज सेविका शीतल  सोमनानी, शोभा सोमनाणी, स्वप्नील पोगुलवार,संचित येनगंटिवार, अर्पित दुधबावरे, प्रमोद सातार अभिषेक गुरणुले,संकेत कुनघाडकर व इतर कार्यकर्ते यांनी रुग्णालयात जाऊन तातडीने मदतकार्य केले. परिस्थितीची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व रुग्णा सोबत चर्चा करण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांमुळे रक्ताचा प्रश्न मार्गी लागला व रुग्णास आवश्यक ती मदत वेळेत मिळाली.

या संवेदनशील कार्यामुळे समाजात समाजसेविकेच्या कार्याची प्रशंसा होत आहे.

Post a Comment

0 Comments