Ideas

मुनघाटे महाविद्यालयात 'महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री' यांची जयंती साजरी

गडचिरोली धानोरा - येथील श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा-संचालित,श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे,कला - वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात  सांस्कृतिक विभाग तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'महत्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री ' यांची जयंती नुकतीच साजरी करण्यांत आली.
           याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्धानी इतिहास विभाग प्रमुख - प्रोफेसर, डॉ राजू किरमीरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात 'महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री ' यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यांत आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ विणा जम्बेवार, डॉ पंकज चव्हाण, डॉ गणेश चुदरी, डॉ पंढरी वाघ, डॉ दामोधर झाडे , प्रा ज्ञानेश बनसोड, डॉ संजय मुरकुटे, डॉ नितेश पुण्यप्रेड्डीवार , डॉ प्रियंका पठाडे, प्रा मांतेश तोंडरे , डॉ सचिन धवनकर , प्रा प्रशांत वाळके यांची उपस्थिती होती.
             जयंती निमित्य महाविद्यालयातील इंग्रजी विभाग तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा प्रशांत वाळके यांनी 'महात्मा गाधी आणि लालबहादुर शास्त्री ' यांच्या विचार आणि कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी सांस्कृतिक विभाग तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या  सर्व सदस्य विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
         संचालन व प्रास्ताविक प्रा प्रशांत वाळके यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रियंका पठाडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments