धानोरा - येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था,गडचिरोली व्दारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ०४/०९/२०२५ ला एक दिवसीय राज्यस्तरीय क्षमता विकास कार्यशाळा आयोजित करण्यांत आली.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व श्री जी सी पाटील मुनघाटे महाविद्यालय,धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेची सुरुवात संस्थेचे आराध्यदैवत श्रीसाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आणि गोंडवाना विद्यापीठ गिताने करण्यांत आली.
याप्रसंगी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ उदय थुल तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य, डॉ प्रशांत जाकी ( शासकीय विज्ञान महाविद्यालय,गडचिरोली) तथा प्रा मानतेश तोंडरे ( वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख) आणि संयोजक- डॉ डी बी झाडे ( भौतिकशास्त्र विभाग प्रमुख) ईत्यादी मान्यवर मंडळी विचारमंचावर उपस्थित होती.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रांत ' अॅकेडेमीक बॅंक आॅफ क्रेडिट ' आणि ' रिसर्च मेथडाॅलाजी ' या विषयावर डॉ प्रशांत जाकी यांनी तर ' आय पी आर ' या विषयावर प्रा मानतेश तोंडरे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
शिक्षण, संशोधन आणि बौद्धिक संपदा संरक्षण या विषयाचे महत्व लक्षात घेवून मान्यवर मार्गदर्शकांनी मार्मिक आणि मौलिक विवेचनातून योग्य माहिती दिली.
सदर कार्यशाळेचे संचालन व प्रास्ताविक डॉ डी बी झाडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सचिन धवनकर यांनी केले. यावेळी डॉ किरमीरे, डॉ जम्बेवार, डॉ वाघ, डॉ चव्हाण डॉ गोहणे डॉ पुण्यप्रेड्डीवार प्रा बनसोड डॉ पठाडे,प्रा.वाळके,प्रा खोब्रागडे मॅडम डॉ भुरसे प्रा धाकळे प्रा करमनकर तसेच मनोज नंन्नावरे राकेश बोंगीरवार यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेची सांगता राष्ट्रगिताने करण्यांत आली.
0 Comments