Ideas

मुनघाटे महाविद्यालयात रासेयो स्थापना दिन साजरा

धानोरा -येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था,गडचिरोली व्दारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २४/०९/२०२५ ला राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यांत आला.
        स्थापना दिनाची सुरुवात अहिंसेचे पुजारी,मानवतेचे प्रवर्तक राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन  करण्यांत आली.
      याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ उदय थुल तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ जम्बेवार, डॉ लांजेवार डॉ पठाडे  ( रासेयो कार्यक्रम अधिकारी ), डॉ गोहणे (सह-कार्यक्रम अधिकारी) ईत्यादी मान्यवर मंडळी प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थित होती.
  याप्रसंगी रासेयोचा इतिहास,उद्देश,ब्रिदवाक्य,त्याग,नेतृत्व गुण, सामाजिक बांधिलकी,समाजसेवा आणि तत्सम अशा विविध अंगाने उपस्थितांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शित केले .अध्यक्षीय मनोगतातून डॉ उदय थुल यांनी रासेयो ही विद्यार्थ्यांच्या मनाची मशागत करणारी प्रयोगशाळा आहे.विद्यार्थ्यांनी स्वंयस्फूर्थीने समाजसेवेचे व्रत अंगिकारावे, प्रत्यक्ष कृतीपूर्ण अभ्यासातून स्वत:सोबत समाजाच्याही विकासात हातभार लावावा असा मौलिक संदेश दिला. रासेयो स्थापना दिवसाचे औचित्य साधून परिसरात फुलझाडांची लागवडही करण्यांत आली.
     
      सदर कार्यक्रमाचे संचालन गौरव सोनुले व प्रांजल वाघाडे यांनी केले, प्रास्ताविक मनोगत डॉ पठाडे यांनी तर आभार प्रदर्शन कु यामीना सोनुले यांनी केले. यावेळी डॉ किरमीरे, डॉ चुदरी, डॉ वाघ, डॉ चव्हाण, डॉ झाडे, डॉ धवनकर, प्रा तोंडरे, प्रा बनसोड , प्रा. वाळके, प्रा मिनाक्षी मॅडम यांच्यासह रासेयो स्वंयसेवक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यांत आली.

Post a Comment

0 Comments