दिनांक : २१ ऑगस्ट २०२५
गडचिरोली :- ७ ऑगस्ट रोजी गडचिरोली तालुक्यातील काटली गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हदरला होता. भरधाव वाहनाने सहा निरागस मुलांना चिरडले होते. या दुर्घटनेत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन बालक गंभीर जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर पीडित कुटुंबीयांवर शोककळा पसरली होती.
या अपघातानंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी त्वरित राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मृत बालकांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली. शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येकी ₹५ लाखांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला.
आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात या मदतीचे धनादेश पीडित कुटुंबियांना प्रदान करण्यात आले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे व जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा तसेच भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते ही मदत कुटुंबीयांना प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, नायब तहसीलदार चंदूजी प्रधान, CMRF चे डॉ.मनोहर मडावी तसेच सहकारी उपस्थित होते.
0 Comments