Ideas

मोहफुलांपासून इथेनॉल निर्मिती करा : आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलापासून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे उद्घाटन झाले. यावरून आज  औचित्याचा मुद्दा सभागृहासमोर चर्चिला जात असताना आमदार भाई जयंत पाटील यांनी मोहफुलापासून इथेनॉलची निर्मिती होत असेल तर शासनाने याचा विचार करावा, तसेच मोहफुलाचा व्यापार बाहेरील जिल्ह्यात करून तेथील आदिवासी बांधवाना आर्थिक उत्पन्न मिळवून द्यावे व तेथील नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून रोजगाराची स्थानिकांना संधी द्यावी, अशी मागणी सभागृहात  केली.

राज्याचे उपमुख्य आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भाई जयंत पाटील यांच्या मागणीचे समर्थन करत यादृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त सबसिडीसह मोहफुलांवरील इथेनॉल निर्मिती उद्योगांना गडचिरोली जिल्ह्यात चालना देण्यात येईल असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments