Ideas

इंदिरानगर येथील निर्मल विद्या मंदिर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम
माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवसा निमित्य उपक्रम

गडचिरोली :- दि. 8 जुलै
    भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी तथा गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज 8 जुलै रोजी गडचिरोली शहरातील इंदिरानगर येथील निर्मल विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सर्वप्रथम माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचा वाढदिवस केक कापुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप योगीताताई पिपरे व भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.


      याप्रसंगी महिला आघाडी च्या जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, नीताताई उंदिरवाडे, भाजपचे शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, दलित आघाडी चे शहर अध्यक्ष प्रा. उराडे सर, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, भाजयुमो चे राजु शेरखी, नरेश हजारे, देवाजी लाटकर, महिला आघाडी शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, नीताताई बैस, अर्चना चन्नावार, शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा वासेकर, शिक्षिका सोनाली सुरणकर, शिक्षिका करीना तटलावार उपस्थित होत्या. याप्रसंगी शाळा परिसरात योगीताताई पिपरे, प्रमोदजी पिपरे व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments