Ideas

चामोर्शी शहरातील अतिक्रमण हटवा : शरद पोटवार यांची मागणी



गडचिरोली :२४

चामोर्शी शहरातुन जाणार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी शरद प्रभाकर पोटवार यांनी स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.

चामोर्शी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर बऱ्याच अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केल्याने होणारी वाहतूक कोंडी, त्यातून होणारे अपघात यांना आळा घालण्यासाठी त्वरित अतिक्रमण हटाव संदर्भात शरद पोटवार यांनी पोलीस प्रशासन,नगर पंचायत यांना दिलेल्या पत्रातून केली. मात्र प्रशासन कारवाई करण्यास हयगय करीत असल्याची खंत त्यांनीं बोलून दाखवली.

१० नोव्हेंबर २०२१ रोजी दिलेल्या मुख्याधिकारी, नगर पंचायत चामोर्शी यांना दिलेल्या पत्रात अतिक्रमण काढण्याविषयी पत्र दिले होते. व वेळोवेळी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली असता कारवाई झाली नाही.त्यानंतर २० फेब्रुवारी २०२३ रोजी तहसीलदार चामोर्शी यांच्याशी लोकशाही दिनी पत्रव्यवहार केला पण कारवाई झाली नाही.
दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने तहसिलदाराने कार्यकारी अभियंता गडचिरोली, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शी, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनच्या चामोर्शी, मुख्याधिकारी नगरपंचायत चामोर्शी, या विभागांना कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले.

सदर पत्राच्या अनुषंगाने कुठल्याही विभागामार्फत अतिक्रमण संदर्भात कारवाई झालेली नाही म्हणून २९ मार्च २०२३ ला स्मरण पत्र दिले पण अजूनही कारवाई झालेली नाही.
माननीय जिल्हाधिकारी यांना लोकशाही दिनी ३ एप्रिल २०२३ रोजी तक्रार दाखल केल्याने निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेळके यांनी सदर विभागाला कारवाई करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे, त्या पत्राच्या आधारे मुख्याधिकारी नगरपंचायत व उपविभागीय अधिकारी (राजस्व) यांच्या दालनात बैठक पार पाडली.व कारवाई करण्यासंदर्भात पोलीस विभागाला पत्र देण्यात आले पण पोलीस विभाग व मुख्याधिकारी नगरपंचायत यांच्या समन्वयाच्या अभावी कारवाई पूर्ण होत नसल्यची खंत पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.


संबंधित अतिक्रमण लवकरच काढण्यात येईल पोलीस यंत्रणा कमी असल्याने त्याला विलंब होत आहे.
श्री.तोडसाम
उपविभागीय अधिकारी
चामोर्शी

Post a Comment

0 Comments