Ideas

३० मे ते ३० जून पर्यन्त भाजपचे जिल्ह्यात महा जनसंपर्क अभियान -भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांची माहिती




चामोर्शी येथे भाजपची जिल्हा कार्यकारिणी बैठक

चामोर्शी :- दि 22 मार्च

केंद्रातील मोदी सरकारला 30 मे रोजी 9 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने 30 मे ते 30 जून पर्यंत महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या आजपर्यंतच्या जन कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी 30 मे ते 30 जूनपर्यन्त महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, या अभियाना अंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती जनतेच्या घराघरांपर्यन्त पोहचविण्यात येणार असून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी दिली. चामोर्शी येथे आयोजित भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत महा जनसंपर्क अभियाना विषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

भाजप जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक काल दि. 21 मे 2023 रोजी चामोर्शी येथे पार पडली. या बैठकीला प्रामुख्याने खासदार अशोकजी नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, बैठकीचे आयोजक आम डॉ देवरावजी होळी, आम कृष्णाजी गजबे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगिताताई पिपरे, प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, माजी जिप सभापती रंजिता कोडाप, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नप उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, चामोर्शी चे तालुका अध्यक्ष दिलीप चलाख उपस्थित होते .
 याप्रसंगी खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आम डॉ देवरावजी होळी , आम कृष्णाजी गजबे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संचालन जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांनी तर आभार  जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी मानले.
  या बैठकीला जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महामंत्री, विविध आघाडीचे अध्यक्ष, महामंत्री, शहर अध्यक्ष, महामंत्री व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments