Ideas

वाघाच्या हल्यात ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबाला मिळाली आर्थिक मदतराईट टाईम न्यूज 
गडचिरोली 9 : राजगाटा माल येथे तारा बाबुराव लोनबले व तीची मुलगी दोघेही सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शेतामध्ये काम करीत असतांना, तारा बाबुराव लोनबले (६५) हिला वाघाने हल्ला करून ठार केले.
सदर घटना २३ डिसेंबर २०२२ ला घडली असून घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी जाऊन चौकशी करून शवविच्छेदनाकरीता शासकिय रुग्णालय गडचिरोली येथे पाठवण्यात आले व कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले. 
वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यामुळे वनपरिक्षेत्र कार्यालय पोर्ला येथे मनोज एस. चव्हान, सहाय्यक वनरक्षक, वनविभाग वडसा तथा उपविभागीय अधिकारी वडसा यांच्या हस्ते तारा बाबुराव लोनबले यांना वन्यप्राण्याने ठार केल्यामुळे त्यांच्या कुटुंबांना धनादेश वितरण करण्यात आले. 
याप्रसंगी आर. बी. मडावी वनपरिक्षेत्र अधिकारी पोर्ला, निवृता राऊत ग्रा.प. सरपंचा पोर्ला, काजल भानारकर ग्रा. प. सदस्या पोर्ला, एस. जी. शेंदरे तांत्रीक वनपाल पोर्ला, दळांजे वनरक्षक पोर्ला तसेच संपूर्ण कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments