Ideas

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओलालवार यांच्या हस्ते कु.दिक्षा गुरनुले हिचा सत्कारबोरी/लगाम:-गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदन जिल्हा म्हणून ओळखला जातो, या जिल्ह्यात अनेक महिला व पुरुष खांद्याला खांदा लावून आपल्या गावाचे नव्हे तर जिल्ह्याचे नाव लौकीक करत आहेत, अशीच एक अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच येथील कु. दीक्षा अनिल गुरनुले राजपूर पॅच येतील छोट्याशा 1500 लोकसंख्येच्या ठिकाणी वास्तव्यात असणारी व गरीब कुटुंबातील असून जिद्द आणि चिकाटी उराशी बाळगुन शिक्षण क्षेत्रात नावलौकिक केला. तिने १ ते ४ पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपुर पॅच येथे घेऊन ५ते १२(विज्ञान) पर्यंतचे शिक्षण राणी दुर्गावती विद्यालय अल्लापल्ली येथे घेतले, 2019मध्ये विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाली .व लगेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जी.एन.एम प्रशिक्षणासाठी 2019 मध्ये निवड झाली, त्यात दिक्षाने तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि सन 2022 मध्ये अंतिम निकाल जिल्ह्यात विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आणि बोरी येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. रवींद्र भाऊ ओलालवार यांच्या हस्ते कु. दिक्षा हीचे सत्कार करण्यात आला. यावेळी बोरीचे सरपंच शंकर कोडापे, पोलीस पाटील सत्यवान मोहूर्ले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विस्तारी गंगाधरीवार , जिल्हा परिषद शाळा बोरी येथील मुख्याध्यापक गोपाल खेवले सर ,सिडाम सर, पांडुरंग रामटेके,दिलीप ओलालवार सुरेश गंगाधरीवार ,पराग ओलालवार उपसरपंच बोरी, ग्रामपंचायत बोरी येथील सचिव ईश्वर दर्रो,राजपूर पँच ग्रामपंचायत चे सदस्य सुरेश गंगाधरीवार,प्रतिष्ठीत नागरिक विनोद ओल्लालवार उपस्थित होते.अशाच पद्धतीने दिक्षा चे अनुकरण करून देश सेवेसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन आपल्या आई वडिलांचे तसेच गावाचे नाव लौकिक करावे. असे यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओलालवार यांनी बोलत होते.

Post a Comment

0 Comments