Ideas

चुटुगुंठा येथे बचत गट नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत कार्यशाळा
बोरी/लगाम 12 :-राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली शाखा लगाम यांच्या विद्यमाने चुटुगुंठा येथे बचत गट नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. खेड्या पाड्यात अनेक बचत गट आहेत,पण त्या बचत गटांतर्गत बचत जमा करणे आणि अंतर्गत कर्ज घेणे, देणे इथेच बहुतांशी गट थांबलेली असतात. इतकेच नव्हे तर बचत गट किंवा त्याचा समूह एकत्र येऊन मोठा व्यवसाय कसा तयार करावा, व्यवसाया मुळे महिलांचे सक्षमीकरण होईलच, पण गावापुढे एक मोठा आदर्श राहील, आणि आपल्या देशाला मोठा हातभार लागेल,त्यासाठी महिलांनी पुढे येऊन गृह उद्योग किंवा मोठा व्यवसाय करण्यासाठी तयारी दर्शवावी,आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कोणीही पीक कर्जापासून वंचित राहू नये प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी व महिला भगिनींनी पुढे येऊन आपला विकास घडवावा यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटणा प्रसंगी  राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चे जिल्हा विकास अधिकारी मा. फुलझेले  बोलत होते. त्याप्रसंगी सर व्यवस्थापक कर्ज विभाग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  गडचिरोली श्री सोरते साहेब तसेच विकास विभागाचे अधिकारी श्री.सांबरे साहेब तालुका समन्वयक मुलचेरा मोहुर्ले साहेब, आणि शाखाधिकारी शाखा लगाम श्री कुरेकर तसेच बँक सखी मनीषा गेडाम सुंदर नगर क्लस्टर कुंबरे मॅडम,आणि लगाम शाखे अंतर्गत बचत गटाचे सर्व सदस्य तथा पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments