आरमोरी येथे तेली समाज वधुवर परीचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
आरमोरी 9 जाने :- .ओबीसी समाजाचे आरक्षण कमी झालेले आहे ते आरक्षण पूर्ववत होण्यासाठी समाज बांधवांनी जागृत होऊन एकत्र येण्याची गरज असून ओबीसी आरक्षण साठी लढा देण्याची आवश्यकता आहे. समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न करावे व समाजाच्या विकासात हातभार लावावा व समाजाला जागृत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले.
श्री संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ आरमोरी यांचे सौजन्याने दिनांक ०८/०१/२०२३ रोज रविवारला दुपारी 1 वाजता संताजी ग्राउंड कोसा विभाग केंद्राजवळ आरमोरी येथे तेली समाज वधु वर परीचय व तेली समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणने करण्यात आले.
मेळाव्याचे उदघाटन माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे होते तर सत्कार मूर्ती म्हणून संताजी सोशल मंडळ, ब्रम्हपुरीचे अध्यक्ष डॉ सतीश कावडे, संताजी भवनासाठी जागा दान देणारे आरमोरीचे माजी सरपंच श्री बुधाजी किरमे, गडचिरोली चे गोपीचंद चांदेवार तेली समाजातील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.सर्व सत्कारमूर्तींचा योगीताताई पिपरे, भाग्यवानजी खोब्रागडे, प्रमोदजी पिपरे, प्राचार्य पी आर आकरे, परसराम टिकले यांच्या हस्ते शाल श्रीफळ संताजीचे मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे, प्राचार्य पी. आर.आकरे, माजी पसं सभापती परशराम जी टिकले, डॉ. संजय सुपारे,उपसरपंच भास्करराव बोडणे, अशोक कुरजेकर ,मिलिंद खोब्रागडे, विलास पारधी, भाग्यश्री खोब्रागडे, सुनीता चांदेवार, निर्मला किरमे, प्रामुख्याने उपस्थित होते.या समाज मेळाव्यात तेली समाजातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ व्यापारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0 Comments