वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी ची प्रथम शाळा असलेले नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय सुंदरनगर ता.मुलचेरा येथे भारतीय स्वतंत्रता संग्रामचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कार्यक्रम तथा शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्ष शाहीन भाभी हकीम यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष अब्दुल जमीर हकीम, डॉ.चित्तरंजन मजुमदार माजी पं स सदस्य,श्यामल पाल ग्रामपंचायत सदस्य, सुमित्रा सरदार सदस्या शाळा व्यवस्थापन समिती, जयंती सरकार सदस्या शाळा व्यवस्थापन समिती, रूपेश सरदार, कमलेश सरकार, प्राचार्य विठ्ठल निखुले, वाढंरे,शाहीद व गावकरी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शाहीन भाभी म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सारखे जीवन अँग्रीकृत केले पाहिजे. तसेच सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा महोत्सव आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन केल्या गेले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी देश सेवेत हातभात लावला पाहिजे.सोबतच विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केला पाहिजे.
0 Comments