Ideas

उपेंद्र रोहनकर यांची कवी कट्ट्यासाठी निवड           गडचिरोली 19 -गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाचे सदस्य तथा झाडीबोलीतून उत्कृष्ट कविता लिहणारे नवोदित कवी उपेंद्र रोहनकर यांच्या  कवितेची वर्धा येथे फरवरी महिन्यात २ तारखेला  होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात "पक्षांचे जीवन' या कवितेची कविकट्ट्यासाठी निवड झाली आहे.

                       या  निवडीमुळे  गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळातील अनेक चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते अनेक  समूहात,वृत्तपत्रात कविता, लेख,चारोळी,अलक लेखन करीत असतात.ते विविध संघटनामध्ये देखील सक्रिय सहभाग नोंदवीत असतात. त्यामुळे गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळ,महाअंनिस, गुरुदेव सेवामंडळ,व सायकल स्नेही मंडळातील अनेक सदस्यांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments