Ideas

वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू




गडचिरोली, ०९ डिसेंबर :- तालुक्यातील आंबेशिवणी येथील नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान नागपुर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात आज ०९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला.

०४ डिसेंबर ला आंबेशिवणी येथे नरभक्षी वाघाने सोनम उंदीरवाडे या 25 वर्षीय महिलेवर हल्ला केला यात ती गंभीर जखमी झाली. तीच्यावर सुरवातीला गडचिरोली रुग्णालयात उपचार सुरू होता परंतू प्रकृती गंभीर असल्याने तीला नागपुर तेथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात भरती करण्यात आले. अखेर पाच दिवसानंतर तीची मृत्यूची झुंज संपली असून तीचा दुर्देवी मृत्यू झाला.

गडचिरोली तालुका वाघाच्या हल्ल्यातील मनुष्यहानीचा हॉटस्पॉट ठरत असून वाघाच्या दहशतीत नागरिकांना जीवन जगावे लागत आहे.

Post a Comment

0 Comments