Ideas

माझ्या विधानसभा क्षेत्राचा विकास हा एकच ध्यास - आमदार डॉ देवराव होळीवाढदिवसानिमित्त  सत्कार प्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रतिक्रिया

पत्रकार भवन गडचिरोली येथे  वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन 

भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे व आरमोरीचे आमदार कृष्णा  गजबे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून  दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


गडचिरोली १० डिसेंबर २०२२ : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून २ वेळा आमदार होण्याची संधी मला जनतेने दिली. या विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या आशीर्वादाने मला हे शक्य झाल. त्यांच्या आशीर्वादाचे ऋण उतरविण्याची जबाबदारी माझी असून या विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा एकच ध्यास आपण घेतला असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉ देवराव  होळी यांनी पत्रकार भवन  येथील  त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  सत्कार सोहळ्याला उत्तर देताना दिली.             भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे व आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवून  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

            यावेळी मंचावर जिल्ह्याचे संघटन महामंत्री ,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे नेते हेमंत जंबेवार , जेष्ठ भाजपा नेते रमेश भूरसे,  शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नगरपरिषदेच्या माजी अध्यक्ष  योगिता पिपरे, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी केशवराव दशमुखे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सभापती रंजीता कोडापे,भाजपा तालुक्याचे अध्यक्ष रामरतन गोहणे,  शहराचे माजी अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर,  उपसभापती विलास दशमुखे, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल  कुनघाडकर,  जिल्ह्याचे भाजप नेते डॉ भारत खटी,  तालुक्याचे संपर्कप्रमुख विलास भांडेकर, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, महिला आघाडीच्या अध्यक्ष कविता उरकुडे, वाकडीचे माजी सरपंच बोरकुटे पाटील,  मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

       या सत्काराच्या प्रसंगी जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लारवार, प्रशांतजी वाघरे, प्रमोद पिपरे, रमेश भरसे , योगिता पिपरे,  मारोतराव ईचोडकर  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

      या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना आमदार डॉ देवराव होळी म्हणाले की,   आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी मागील सात आठ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत असून यापुढे आपले प्रयत्न अविरत सुरू राहतील .या विधानसभा क्षेत्राचा विकासाचा एकच ध्यास आपण घेतलेला असून विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सातत्यानं काम करुअसे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments