Ideas

महात्मा गांधी महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे शैक्षणिक सहलीचे आयोजन

आरमोरी, दि. २२/११/२०२२

            स्थानिक महात्मा गांधी कलाविज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालयआरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित बी. ए. भूगोल विषयाच्या हिवाळी-२०२२ सत्रातील शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी तलाव परिसंस्थेचा अभ्यास करून यामध्ये तलाव परिसंस्थेतील विविध घटकांचा सखोल अभ्यास केलाज्यामध्ये वनस्पती आणि प्राणी जीवन यांच्यातील अन्नसाखळी, अन्नजाळी, उत्पादक, भक्षक व अपघटक इत्यादी विषयी सखोल माहिती जाणून घेतली. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

            भौगोलीक व शैक्षणिक सहलीच्या यशस्वी आयोजनामध्ये भूगोल विभागप्रमुख प्रा. पराग मेश्रामडॉ. विजय गोरडे व बी.ए. भूगोल विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.  




Post a Comment

0 Comments