Ideas

संविधान दिन व आम आदमी पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त रॅलीचे आयोजनगडचिरोली:- आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने संविधान दिनानिमित्त तसेच आम आदमी पार्टीचा दहावा वर्धापन दिनानिमित्त आप गडचिरोली जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वाखाली दिंनाक २६ नोव्हेंबर २०२२ मुख्य शहरात जन संपर्क कार्यालय कॅम्प एरिया सुरुवात झाली ते रेड्डी गोडाऊन ते मुख्य मार्ग इंदिरा गांधी चौक येथे संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले तसेच संविधान चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व घोषणा देत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.व जनतेला मिठाईचे वाटप करून गोडवा निर्माण करण्यात आले. 
 आप राष्ट्रीय संयोजक तथा दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांच्या दिल्ली आणि पंजाब मध्ये बहुमताच्या जोरावर सुरू असलेले यशस्वी सरकार सर्व सामान्य जनतेला न्याय देत असून विज,पाणी,शिक्षण,आरोग्य, रोजगार या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेले सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी पार्टीचे गडचिरोली चे प्रयत्न आहेत. तसेच पार्टीचा दहावा वर्धापनदिन दिन व जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी संविधान प्रास्ताविक वाचन केले दिन‌‌‌ उत्साहात साजरा करण्यात आले त्यावेळी जिल्हा सचिव भास्कर इंगळे, संघटन मंत्री डॉ देवेंद्र मुनघाटे ,कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, महिला संयोजक समीता गेडाम ,सोनल ननावरे,अल्का गजबे, दीपिका गोवर्धन, संतोष कोटकर, भाऊराव मानपलीवर,अचीत प्रमोद वाटे,बाबुराव गेडाम, सुकेशीनी रामटेके,अल्का खेरकर,चंद्रमनि रामटेके,विश्वास कतरोजवर,नामदेव पेंदाम,देवाजी दांडिकवर,विनोद कुघाडकर,पौर्णिमा उंदिरवाडे, गीता गोवर्धन, वछला उंदिरवाडे, महानंदा गोवर्धन, मयुरी गोवर्धन, ठाकूर, अमन साखरे,मुकेश जनबंधु, एकनाथ गजभे, महागु पिपरे, प्रभाकर मुतेलवार,विद्या नेवारे, कविता कुमरे,भुषण चौधरी,दिवाकर साखरे,प्रभाकर वाकडे आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments