Ideas

भांडवलदारांच्या घशात 'खोके' घालणारा अर्थसंकल्प - भाई रामदास जराते, जिल्हा चिटणीस,शेतकरी कामगार पक्ष,
गडचिरोली ९ : एक रुपयांत पिक विमा हा राज्यातील शेतकऱ्यांच्या नावाने विमा कंपन्यांच्या तिजोऱ्या भरणारी ३३०० कोटींची तरतूद  ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. लोडशेडींग करुन  शेतकऱ्यांना नागवणाऱ्या सरकारने या अर्थसंकल्पात केवळ उद्योगपतींच्या हिताच्या तरतूदी केल्या आहेत. विद्यार्थी, बेरोजगार,कामगार, मच्छिमारांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. पुर्व विदर्भाला खाणींमुळे होणाऱ्या विस्थापना पलिकडे कोणताही उद्योग मिळू शकलेला नाही. एकुणच 'खोके' सरकारने केवळ भांडवलदारांच्या घशात 'खोके'  घालणारा अर्थसंकल्प सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments